कोकणा जमातीची ओळख.
कोकणा
जमात
कोकणा (कोकणी) ही
आदिवासी जमात इतर आदिवासी जमातींप्रमाणेच येथिल मूळ जमात असून अरबी समुद्रकाठाच्या
कोकण या प्रांतातून स्थलांतरीत झाली आहे. Compendium of orders and Directions
–Issued by Govt. in respect of Tribal Welfare and Tribal sub plan 1981 नुसार
कोकणा जमातीचा अनूसूचित जमाती म्हणून भारतीय संविधानात उल्लेख केलेला आहे.
कोकणा या जमातीला अनेक
समानार्थी नावे आहेत. कोकणी, कुकणी अश्याही नावांनी ओळखले जाते. कोकण
किनारपटटीवरून व जव्हारहून ही जमात पुढे महाराष्ट्रात नाशिक धुळे व पुढे नंदूरबार
जिल्हयापर्यंत पसरलेली आहे. ठाणे, रायगड तसेच गुजरातमधील डांग, सुरत, बडोदा,
धरमपूर, वलसाड जिल्हयात या जमातीचे वास्तव्य आढळते. समुद्रकिनारा व सहयाद्री
डोंगररांगा मधील भागात या जमातीची वस्ती मोठया प्रमाणात आढळते. गुजरातमध्ये कुकणा,
कुकणी, कोकणे या नावाने ओळखली जाणारी ही जमात महाराष्ट्रातील कोकणा आदिवासी जमात
आहे. या लोकांची मराठी गुजराती ही मिश्र भाषा असते.
कोकणा जमातीमधील
लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असतो. सुरवातीला बदलती शेती, विवाहसबंध़़, सालगडी या
कारणांमूळे गुजरात परीसरातील कोकणा नाशिक जिल्हयाच्या पश्चिम भागात पेठ, सुरगाणा,
त्रंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, इगतपूरी, बागलाण तसेच धुळे जिल्हयात परीसरात पसरले. कोकणा
समाजाची वस्ती मोठया प्रमाणात आजही नाशिकच्या पश्चिम पटटयात असल्याने तेथिल भागास
कोकण म्हणून ओळखले जाते.
No comments:
Post a Comment