आदिवासींचा सण वाघबारशी
वाघबारशी
आदिवासी भागामध्ये वाघदेव
ही महत्वाची देवता आहे. वाघ हा सर्वशक्तीमान प्राणी आहे. वाघापासुन माण्से,
जनावरे यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून अश्विन व्दादशीला वाघबारशी हा सण साजरा
केला जातो.
आश्विन महिन्यात वाघीणीचा
जननकाळ असतो, याच महिन्यात सर्व ठिकाणी गवत, झाडे वाढलेली असतात. त्यामुळ माणसे,
गाय, म्हैस, शेळया, रेडे, बैल ही वाघाच्या भक्षस्थानी पडतात. म्हणून वाघ हा
शक्तीमान तसेच उपद्रवी प्राणी असल्याने त्याला मान दिला तर तो शांत होईल, हल्ला
करणार नाही हया हेतुने वाघबारशीचा सण साजरा करतात.
वाघबारशी सण कसा साजरा करतात
आदिवासी भागामध्ये
वाघदेवाला जंगलाचा राजा मानले जाते. त्याला आपण राजाचा मान दिला पाहिजे. त्याला
प्रसन्न करण्यासाठी, शांत करण्यासाठी वाघदेवाची विधीवत पुजा करून त्याला आरवत
कोंबडयाचा बळी दिला जातो. वाघदेवाला प्रसन्न करण्यासाठी वाघबारशीच्या दिवशी प्रत्येक
घरातुन आणलेल्या कोंबडयाला कापून त्याचे रक्त येथे शिंपडले जाते. काही घरातुन नारळ
फोडून वाघदेवाची पूजा केली जाते.
वाघबारशीच्या दिवशी,
वाघ्याची भायरो, दुधभात
खायरो !
वाघ्या गेला रागी, तं डांगर
मागी !
तांब्याला आसरा, घरी
दोन वासरा !
दिवाळी दसरा, भाजीपाला
विसरा !
अशी
गाणी म्हणत, लहाण मुले, बांबुच्या टोपलीमध्ये झेंडुची फुले लावतात. त्यामध्ये पिठ
ठेवतात.
गावातील इतर पाडयावर
तांदुळ, दुध व पैसे मागत फिरतात. हे जमविलेले साहित्य एकत्र करून त्याचा स्वंयपाक
केला जातो. त्या स्वंयपाकातील थोडा-थोडा नैवदय प्रसाद म्हणून प्रत्येक घरी वाटला
जातो.
No comments:
Post a Comment