महत्वाची माहिती

Sunday, October 25, 2020

आदिवासी क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा

आदिवासी  क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा

बिरसा मुंडा (Birsa Munda) (१५ नोव्हेंबर १८७५ – ९ जून १९००)

परीचय

जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड मधील उलिहातू या गावात झाला. बिरसा मुंडा यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कुल मध्ये झाले.  लहानपणापासुनच बिरसा यांना सर्वांमध्ये मिळूण-मिसळूण राहण्याचा स्वभाव होता. त्यामुळे त्यांनी तरूण वयातच समविचारी, समवयस्क लोकांचे संघटन केले. बिरसा मुंडा यांचे वडील सुगन मुंडा यांचे ख्रिस्ती मिशनरी व इंग्रजांनी जबरदस्तीने धर्मांतरण केले. अशिक्षित आदिवासी लोकांवर इंग्रजांकडून होणाऱ्या अत्याचाराचा इंग्रज आधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा बिरसा यांनी विचार केला. बिरसा मुंडांचे स्वामी आनंद पांडे गोडगेडा गांव यांना गुरू मानले होते. गुरूंच्या आशिर्वादाने आणि समवयस्क सहकाऱ्यांच्या बळावर बिरसा मुंडा यांनी नागपुर परीसरात इ.स. 1895 साली इंग्रजांविरूध्द लढा उभारला.



इंग्रज सरकारने बिरसांना अटक करून तुरूंगात टाकले, त्यांचा अतोनात छळ केला.  दिनांक 09 जुन 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा कारागृहातच मृत्यू झाला.  

जीवन

बिरसा मुंडा यांना शिक्षणाची अत्यंत आवड होती. सुरुवातीला ते आयुभातुजवळ सलगा गावी जयपाल नाग या वनवासी व्यक्तीने चालविलेल्या आश्रमात जात. पुढे बिरसांचे मोठे भाऊ कानु यांनी त्यांना जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये दाखल केले. शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी भाषणामध्ये मुंडा आदिवासींबद्दल ठग, चोर, बेइमान शब्दांचा वापर केला. तेव्हा बिरसा यांनी फादर नोट्रोट यांना खडसावून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे मुंडा यांना शाळेतून काढण्यात आले.

पुढे त्यांनी शिक्षणासाठी अंगीकारलेल्या ख्रिश्चन धर्माचा त्याग केला. उदरनिर्वाहासाठी ते बांदगाव येथे वास्तव्यास होते. त्यांचा विवाह हिरीबाई नावाच्या मुलीशी झाला परंतु अल्पावधीतच तिचे निधन झाले. बिरसा यांनी आनंद पांडे या वैष्णवपंथीयांकडून धार्मिक शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असताना मुंडा जमातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये धर्मामध्ये परिवर्तन व सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हिंदू, ख्रिश्चन व मुंडा आदिवासी या धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्रित करून नव्या बिरसाईट धर्माची स्थापना करून त्यांनी लोक संघटन केले. तसेच मुंडा जमातीत एकता निर्माण केली. ईसाई धर्म हा विदेशी असल्यामुळे तो आपल्या पूर्वजांच्या परंपरेला कलंकित करणारा आहे. अशी लोकजागृती ते करू लागले. त्यामुळे भगवान बिरसा म्हणून ओळखले जाऊ लागले.

सामाजिक कार्य

1857 च्या क्रांतीनंतर इंग्रजांनी छोटा नागपुर परीसरातील मुंडा आदिवासींच्या जमिनी हिरावून घेतल्या होत्या. इंग्रजांनी घेतलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी मुंडाचे प्रमुख सरदार यांनी संघर्ष सुरू केला. तो संघर्ष सरदारी लढाई म्हणून प्रसिध्द झाला. बिरसा यांनी चालविले आंदोलन दडपण्यासाठी गावातील लोकांच्या जमिनीवर वन आधिकाऱ्यांचा आधिकार आहे असा नियम लागू केला. आदिवासी केवळ अशिक्षित रहावा, दारूच्या नेशेत राहावा म्हणून ठेकेदारांना दारूचे अडडे चालविण्यास परवानगी दिली. त्यामुळे आदिवासी लोक आंदोलनापासून वेगळे राहतील.

1894 मध्ये आदिवासी भागात  दुष्काळ पडला. इंग्रजांकडून येथिल आदिवासींना कोणतीही मदत केली नाही. मात्र आदिवासींकडून महसुल ठराविक तारखेलाच रोख स्वरूपात भरण्याची सक्ती केली. त्यामुळे अनेक आदिवासींच्या जमीनी सावकार व जमीनदारांकडे गहाण ठेवाव्या लागल्या. यामुळे बिरसा यांनी आदिवासी तरूणांचे संघटन केले.  इंग्रजांपुढे  आवाज उठविला, स्वराज्याची घोषणा केली. इंग्रजांनी बिरसा व त्यांच्या सहकाऱ्यांना सन 1895 मध्ये बंदी बनवले. बिरसांच्या अटकेमुळे आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाल्याने त्यांची सुटका सन 1897 मध्ये करण्यात आली.

कैदेतून सुटल्यानंतर बिरसांनी सेवादलाची स्थापना केली. प्रत्येक गावात गुप्त बैठका घेऊन मुंडाराज्य स्थापन करण्यात आल्या. मुंडाराज्यामध्ये साधारण ५,००० आदिवासी सामील झाले. बिरसांनी कायद्याची लढाई सोडून १८९९ पासून इंग्रज अधिकारी,  ठेकेदार, जमीनदार, सावकार व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्राणघातक हल्ले करण्यास सुरुवात केली. सिंगभूम, चक्रधरपूर, रांची, खुंटी, कोरा, तामाड या प्रदेशांतील पोलीसचौक्या जाळण्यात आल्या. या मुक्ती आंदोलनाला मुंडारी भाषेत ‘उलगुलानʼ असे म्हणतात. या आंदोलनात आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. पोलिसांच्या गोळीबारात व मुंडांच्या तिरकामठ्यांद्वारे हजारो पोलीस व मुंडा आदिवासी मारले गेले. अखेर बिरसांना शह देण्यासाठी इंग्रजांनी कूटनीतीचा करून बिरसांना जो कोणी पकडून देईल, त्यास इंग्रजांकडून ५०० रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले. पैशाच्या लोभाने मनमारू, जवाईकेला या गावातील काही युवकांनी बिरसा जंगलात असल्याची माहिती इंग्रज आधिकाऱ्यांना दिली.  १९०० रोजी बिरसांना पकडण्यात आले. बिरसा मुंडा यांचे रांची येथे कैदेत असतांना निधन झाले.

आदिवासी-हक्क, स्त्री-स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून बिरसा मुंडा यांची ओळख आहे. रांची येथील डिस्टिलरी पुलाजवळ बिरसांची समाधी असून तेथे त्यांचा पुतळा उभारला आहे. तसेच रांची येथील केंद्रीय कारागृहास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळास बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे.

संदर्भ – 01 इंटरनेट सोर्स

02 विकीपेडीया च्या मदतीने संकलन

 


3 comments: