1857 चा पेठचा स्वातंत्र उठाव
आम्ही आदिवासी ब्लॉग
नाशिक जिल्हयामध्ये पेठ
तालुका हा पश्चिमेला आहे. संपुर्ण आदिवासी लोकांचा तालूका म्हणून पेठची ओळख आहे.
1857 चा पेठ स्वातंत्र उठाव
1857 साली आजचा पेठ
तालुका हे एक संस्थान होते. सस्थानाच्या राणी बेगम नावाने प्रसिध्द होत्या. राणी
बेगम हया हरसुल या ठिकाणी राहत होत्या. बापूराव खर्डिकर हे राणी बेगम यांचे प्रमुख
सल्लागार होते. पेठमधील जहागीरदार, देशमुख, देशपांडे या वतनदारांना जमीनीच्या
रूपाने दिलेली मालकी आजही बऱ्याच प्रमाणात टिकूण आहे.
इंग्रजांचा जुलूम, वेळोवेळी येणारे
दुष्काळ, अरोग्य समस्या, सावकारशाही यामुळे पेठ तालुक्यातील जनता त्रासली होती.
याचवेळी भगवंतरावांनी इंग्रजाविरूध्द उठावाचे ठरवून सर्व ठाणेदारांना विश्वासात
घेतले. सर्वांच्या मदतीने एका दिवशी डांग परीसरातुन कोकणा व भिल्ल मंडळी पेठ येथे
आली. पेठ येथे भाऊराजा व इंग्रजांचा खजिना ठेवला होता. पेठमधील कारकुनांना बाहेर
काढुन, काहींना झाडाला बांधून कचेरीतील दप्तर जाळले. भाऊराजांचा खजिना वगळूण फक्त
इंग्रजांचा खजिना लुटला.
खजिना लुटल्यानंतर आरामासाठी पेठ आणि
कापुरझिरा या दरम्यान आळवाची बारी येथिल आंब्याच्या झाडाखाली लोक थांबले. लुटीसाठी
आणलेले काठया, बांबू काहींनी येथेच टाकल्या, घटनेनंतर चौकशी झाल्यावर बंडखोर हे
हजारोंच्या संख्येने आले असावेत असा अंदाज केला जातो. आजही येथ हजार टेमक्यांची बारी आहे.
ब्रिटीश सरकारने भगवंतराव देशमुख,
पेठचे पोलिस पाटील भाऊ माळेकर, कुंभाळयाचे पोलिस पाटील गटू पाटील यांच्यावर
कार्यवाही करून फाशी देण्यात आली. पेठचा 1857 चा उठाव ही अत्यंत महत्वपुर्ण घटना
होती. 7000 हजार आदिवासी लोकांचा जवळपास या उठावामध्ये सहभाग होता. हा उठाव मोडून
काढण्यासाठी ब्रिटीश सरकारने म्होरक्यांना फाशी, सर्वांसमोर गोळी झाडण्याचे सत्र
सुरू केले. मामलेदार, पोलिस, फॉरेस्ट आधिकारी दिसले की लोक जंगलात पळून जायचे.
फक्त नाईक, पाटील हेच थांबायचे. ब्रिटीश सरकारविषयी आदिवासी लोकांच्या मनातील भिती
दुर व्हावी म्हणून पांडू कृष्णा पाटील यांना लोकल बोर्डात सदस्य् म्हणून घेतले.
त्यामुळे 1911 मध्ये बोरवटला शाळा सुरू केली.
पेठ, सुरगाणा, त्रंबकेश्वर, बागलाण,
कळवण या तालुक्यात कोकणा लोकवस्ती आधिक प्रमाणात आहे. तरीही भिल्ल, कोकणा, महादेव
कोळी, वारली, कातकरी, गोंड, नाग, ठाकूर या आदिवासी जमातींनी या उठावात भाग घेतला.
पेठच्या स्वातंत्र साठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तुरूंगवास भोगला,
मारहान सहन केली, अनेकजण फासावरही गेले. यावरून आदिवासी ही एक लढाऊ बाण्याची
संस्कृती आहे.
पेठचे राजे हे महादेवकोळी होते ?
ReplyDeleteत्यांचा उल्लेख कोळी म्हणून का केला जातोय ?
त्यांचे वंशज आज कुठे आहेत ?
ऐतिहासिक संदर्भ ,साल,समकालीन घटना असत्या तर बर झाल असते .७००० भिल्लाचा उल्लेख खानदेश गेझेटर नढे आहे .धन्यवाद जय आदिवासी
ReplyDelete