महत्वाची माहिती

Wednesday, November 4, 2020

आदिवासी शेतकऱ्यांचा नायक तंटया भिल्ल

आदिवासी शेतकऱ्यांचा नायक  तंटया भिल्ल



तंटया भिल्ल-

 इंग्रज भारतात व्यापार करण्याच्या निमीत्ताने आले. राजेराजवाडयांकडे आश्रयास राहून त्यांनी धंदयात जम बसविला. इंग्रजांनी व्यवसायाचा तराजू फेकून दिला, तोडा व फोडा या नितीचा अवलंब केला. भारतीय राजांना हरवून सगळा प्रदेश त्यांच्याकडून काबीज केला. साधारण दिडशे वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केले.

भारतीय राजांना जनतेची काळजी नव्हती, ते इंग्रजांची गुलामगिरी करीत होते. तर काही राजे स्वाभीमानी होते. गुलामगीरी त्यांना मान्य नव्हती. सर्वत्र असंतोष माजला होता. इंग्रजी राजवट ही जुलमी स्वभावाची होती. देशातील सर्व संपत्ती त्यांनी इंग्लंडला जात होती. हे काही राजांना आवडत नव्हते. इंग्रज सरकारचा विरोध करीत होते. यात झाशीची राणी, तात्या टोपे, सातपुडयातील, विंध्यातील भिल्ल आदिवासी होते. डोंगर-दरीत, रानावनांत आदिवासी लोक राहत होते. तेच जंगलचे मुळ रहिवासी तेच होते. इंग्रज सरकारने जंगलाची मालकी स्वत:कडे घेतली त्यामुळे जंगलातली माणसे बेघर होऊ लागली. आदिवासी लोक पेटून उठले, बंड पसरू लागले.

सातपुडा पर्वतामध्ये असललेल्या जंगलात बिरडा गाव होते. या गावात भाऊसिंग भिल्ल राहत होता. भाऊसिंगला एक मुलगा होता त्याचे नाव तात्या होते. तात्यांच्या आजोबांनी पाटलांकडून घेतलेल कर्ज न फिटल्याने जमीन गेली. तात्यांचे वडील भाऊसिंग दुसऱ्यांची जमीन कुळाने (बटाई) कसत होते. कुळाची रक्कम देता येत नव्हती. भाऊसिंग आजारी पडला, मरतांना त्यांनी तात्याला सांगितले की पोखर गावाला आपली जमिन आहे. ती कर्जात अडकली आहे.

तात्या सैरभर झाले अगोदर त्यांची आई वारली अन मग वडील. तात्यांनी बिरडा गाव सोडले. पोखरला आले. पाटलांना भेटून आजोबांचे कर्ज फेडतो असे सांगितले. जमीन परत मागीतली, मात्र  पाटलांनी तात्यांचा काटा काढायचे असे ठरविले. पाटलानी त्यात्यांची खोटी तक्रार पोलीसांत केली. तात्याला अटक झाली. नागपुर तुरूंगात त्यांना पाठविले. शिक्षा पुर्ण केल्यावर तात्या पुन्हा पाटलांकडे आले. मला जमिन परत दया, पाटील हो म्हणाले तात्या शेतावर राबू लागले.  पाटलांनी दुसऱ्यांदा पुन्हा तात्यांना अडकवले, शिक्षा झाली. पाटील  तात्यांवर अन्याय करीत होते, पोलीस पाटलांची मदत करीत होते.  तिसऱ्यांदा पुन्हा तात्यांना अडकवले.  खंडवा जेलमध्ये त्यांना शिक्षा झाली. रात्री तात्या जेल फोडून बाहेर आला. त्याच्याबरोबर काही साथीदार होते.

तात्याचा तंटया झाला. पाटील सावकार होते. सावकारांनी गरीबांची पिळवणूक चालविली होती. सावकारांना पोलिस मदत करत होते. म्हणून सावकार व पोलिसांना धडा शिकवायचा तात्यांनी निर्णय घेतला. तंटयाने साथीदारांच्या मदतीने मोठी टोळी निर्माण केली. भूईफळ गावच्या पाटलांनी खोटी साक्ष दिल्याने तंटयाने त्यांना तंटया बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा निरोप पाठविला.  तंटया व त्याचे साथीधारांनी भूईफळच्या पाटलांना धडा शिकविला.

सातपुडयाच्या रांगामध्ये तंटयाचे नाव गाजू लागले. तरूण साथीदार तंटयाच्या टोळीमध्ये सहभागी होत होते. तंटया सरकारला लूटू लागला, लुटलेली रक्कम ही गरीबांना वाटू लागला. अडचण असलेल्या माणसांना वाटू लागला. पोलिसांच्या ठाण्यांवर हलला करू लागला. तंटया हा गरीबांचा वाली बनला होता. इंग्रज सरकारने तंटयाविरूध्द कैद करण्यासाठी मोहिम सुरू केली. तंटयाला पकडण्यासाठी बक्षिस ठेवण्यात आले.

तंटया चतुर होता, त्याने पोलिसाचा वेष घेऊन सावकाराला दम देऊन खंडणी घेतली. नाव्हयाचे सोंग घेऊन एका फौजदाराचे नाक कापले. त्यामुळे सरकारने त्याच्यावर असलेल्या बक्षिसाची रक्कम वाढविली. गावोगाव तंबू लावून, फौज तैनात केली पण तंटया इंग्रजांच्या हातात येत नव्हता. हे सर्व प्रयत्न करूनही सावकार आणि पोलिसांना तंटया शिक्षा करीत होता.

स्त्रियांना तंटया भाऊ वाटत होता. सगळयांना तंटया आपला वाटत होता. तंटया सगळया आदिवासी जनतेचा तारणहार बनला होता. शेतकऱ्यांसांठी तंटया देवच होता. सलग अकरा वर्ष तंटयाने ब्रिटिश सरकारला चकमा दिला. नर्मदेच्या खोऱ्यात दोनशे मैलांमध्ये जंगलचा राजाच होता.

इंग्रज हे कुटनितीचे होते, त्यांना कळून चुकले की तंटया सरळ हाती येणार नाही. इंग्रजांनी मानलेलेल्या बहिणीच्या नवऱ्याला मोहात अडकवले, पैसे देऊन माहिती घेतली. तंटया रक्षाबंधणासाठी मानलेल्या बहिणीकडे आला. तंटयाला धोक्याने अटक केली. इंग्रजांनी तंटयाला जबलपुरच्या जेलमध्ये टाकले. खटला भरून वीर तंटयाला फाशी देण्यात आली. वीर बहादुर तंटयाची कहानी महाराष्टातील व मध्यप्रदेशातील घराघरात पोहचली. आदिवासी शेतकऱ्यांचा तंटया पहिला नायक आहे.


1 comment: