महत्वाची माहिती

Wednesday, September 30, 2020

नाशिक जिल्हा आदिवासी समाज जीवनाची ओळख व इतिहास

नाशिक जिल्हा आदिवासी समाज जीवनाची ओळख व इतिहास

  


नाशिक जिल्हयाचा पश्चिम भाग हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात मुख्यत्वे सुरगाणा, पेठ, त्रंबकेश्वर हे तालुके येतात. याभागाला  डांग अथवा कोकण या नावानेही स्थानिक लोक ओळखतात. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हयांपैकी बहूसंख्य आदिवासी लोकसंख्या अससलेला नाशिक हा महत्वपुर्ण जिल्हा आहे. नाशिक मधील आदिवासी लोकांचा इतिहास शौर्य व परंपरा गाथांनी भरलेला आहे. तसेच कोकणा लोकांचे सुरगाणा ही राज्ये इतिहास काळापासून प्रसिध्द आहे. कोकणा समाजाची सुरगाणा, पेठ, धरमपूर, वासदा, जव्हार ही पाच संस्थाने होती. हजारो वर्षापासून कोकणांचे या परीसरात वास्तव्य आहे. हे त्यांच्या लोककथा, दैवत कथा, लोकगीते या वरून माहिती होते.

            बागलाणमध्ये कोकणा आदिवासी समाज मोठया प्रमाणावर राहतो. हा भाग गुजरात मधील डांग जिल्हयाला लागून आल्याने डांग सौदाणे, डांग शिरवाडे अशी गावे येथे आहेत. हा कोकणी आणि भिल्लांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या परीसरात सहयाद्रीची दोन उंच शिखरे साल्हेर-मुल्हेर ही आहेत. तसेच ते दुर्भेदय व मजबूत असे प्राचीन किल्ले आहेत. या दोन किल्ल्यांच्या आश्रयाने राठोड वंशीय राजपूतांचे बागुल नावाचे प्रसिध्द राजघराणे होते. या बागुलांनी सुमारे 300 ते 350 वर्षे या भागावर राज्ये केले.  या राजघराण्याच्या नावावरून या प्रदेशास बागलाण असे नाव मिळाले.

            पेठ, त्रंबकेश्वर तालुक्यात वाघेर किल्ला, खैराय किल्ला हे प्रसिध्द आहेत.  डोंगराळ प्रदेशातील पाऊलवाटा, चोरवाटा, धनुष्यबाण, तीरकामठा, गोफण, गलूल तसेच पशूपक्ष्यांचे आवाज या गोष्टी आदिवासी बांधवांना ठाऊक आहेत. पेठ-सुरगाणा येथे आदिवासी लोकांचे स्वतंत्र राज्य होते. पेठ येथे जहागिरदारांच्या प्रदेशावर पेठचे भगवंतराव देशमुख हे राजे होते. सुरगाण संस्थानचे धैर्यशिलराव पवार हे राजे होते.

                नाशिक जिल्हयामधे कोकणा, भिल्ल, ठाकर, महादेव कोळी, कातकरी या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. या जमातीपैकी कोकणा ही जिल्हयातील प्रमुख आदिवासी जमात आहे. 

No comments:

Post a Comment