महत्वाची माहिती

Thursday, September 24, 2020

कणसरी (नागली), अन्नदेवता आदिवासी देव-देवता

 

आदिवासी देव-देवता – कणसरी (नागली)

 

नाशिक जिल्हयातील आदिवासी बांधव शेतीमध्ये नाचणी (नागली) या पिकाची शेती करतात. पेठ, सुरगाणा, त्रंबकेश्वर तालूक्यातील आदिवासी लोक कणसरीला अन्नदेवता मानतात. नाचणी हे येथील लोकांचे मुख्य पिक आहे. त्याचबरोबर भात, उडीद, खुरसणी,वरई यांची पण शेती केली जाते.

कणसरी (नागली) अन्नदेवता-

महादेवाने कुलंब्याला म्हणजेच आदिवासी शेतकऱ्याला ही कणसरी प्रथम दिली अशी येथिल लोकांची धारणा आहे. येथिल आदिवासी शेतकऱ्याने तीची मनोभावे पूजा केली. कणसरी ही स्वभावाने खूप रागीट आहे. असा आदिवासी बांधवांचा समज आहे. आदिवासी बांधवांच्या मते कोणतीही शेतातील पिके सांडपसारा, नासाडी, स्वयंपाकात नासाडी, जाळणे असे केल्यास ती रागावतात. ती आपल्याला पून्हा पावत, मिळत नाही. तसेच शेतात पिकवलेल्या पिकाला येथिल बांधव देव मानतो. त्यामुळेच आपले पूर्वज, आपले आईबाप, आपण तीची पेरणी, लागवड, कापणी, मळणी करतांना कणसरीची आपण पूजा करतो. त्यानंतरच आपण कामाला सुरवात करतो. शेतातील नागलीची कणसे पूजा करूणच कापली जातात. 

मळणी केल्यानंतर आदिवासी बांधव कणसरीला घरी आणण्यासाठी हळद कुंकू वाहून, उदबत्ती, नारळ फोडतात. काही शेतकरी मळणी झाल्यावर कोंबडयाचे रक्त शिंपडतात. आदिवासी बांधवांनी कणसरीला आपल्या देव्हाऱ्यात स्थान दिले आहे. आदिवासी बांधवांचे कणसरी अन्नदेवता  प्रती असलेली श्रदधा व भाव या बाबींवरून दिसतो.

कणसरी किंवा नागली(नाचणी) चे महत्व

1 नागली उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

2 नागलीमध्ये मोठया प्रमाणावर कॅ‍ल्शियम, लोह, प्रथिने, तंतूमय जीवनसत्व, खनिजे असल्याने शरीरास पौष्टिक आहे.

3 नागलीच्या सेवनाने रक्ताशयासारखे आजार कमी होतात.

4 हाडांच्या मजबुतीसाठी नागली उपयुक्त असते.

5 लहान मुलांना नागलीची बिस्किटे दिली जातात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

नागलीपासून  तयार होणारे पदार्थ

1 नागलीची भाकर

2 नागलीची पेज (पातळ सारण)

3 भरडा

4 पापड

5 बिस्किट

6 चिक्की

No comments:

Post a Comment