नाशिक जिल्हयामध्ये
पेठ, सुरगाणा, त्रंबकेश्वर, इगतपूरी, कळवण, सटाणा असे आदिवासी तालुके आहेत. या
आदिवासी डोंगराळ भागामधील लोकांचा व निसर्गाचा ऐकमेकांशी घनिष्ठ सबंध आहे. या भागामध्ये
निसर्गातील जंगलात राहणाऱ्या वाघाला देव मानतात. त्याची दरवर्षी पूजा केली जाते.
गावाच्या वेशीवर त्याची मूर्ती स्थापन केली जाते. आज आपण वाघदेवाविषयी माहिती
घेणार आहोत.
वाघदेव
गावाच्या वेशीवर
म्हणजेच जेथे गाव संपल्यावर जंगल सूरू होते तीथे वाघदेवाच्या मुर्तीची स्थापना
केली जाते. या ठिकाणी शिसव, शिरस, साग
तसेच काटेरी बांबू असतात. पूर्वी वाघदेवाची मुर्ती ही लाकडापासून बनवली जायची
मात्र अलीकडे सन 2000 पासून बऱ्याच गावांमध्ये ही मुर्ती दगडापासून तयार केलेली
आणतात. त्या मुर्तीची गावाकडून पुजा करून स्थापना केली जाते.
वाघदेवाच्या मुर्तीमध्ये वाघाचे शिल्प
दगडावर कोरलेले असते. तसेच त्याच दगडावर सुर्य, चंद्र कोरलेले असतात. जंगलामध्ये आढळणारे
मोर, नाग, विंचू हे पण त्यावर दाखविलेले असतात. सोबत शेतकरी सुध्दा या दगडावर
कोरलेला असतो.
वाघदेवाची पूजा
आदिवासी भागात दिवाळी
मध्ये वसू बारशी च्या मुहूर्तावर वाघदेवाची पूजा आदिवासी बांधवामार्फत केली जाते. वाघदेवापासून
आपले तसेच आपली गुरे-ढोरे, पशू-पक्षी, आपले कुटुंब यांना कोणतेही नुकसान होऊ नये. साप,
विंचू यापासुनही आपले रक्षण व्हावे. म्हणून या वसूबारशी च्या दिवशी वाघदेवाला
आदिवासी बांधवाकडून कोंबडयाचा बळी देऊन पुजा केली जाते. या दिवशी प्रत्येक आदिवासी
कुटूबांमध्ये वाघदेवाच्या पुजेसाठी वाघदेवाजवळ कोंबडा कापला जातो. त्या ठिकाणी अगरबत्ती,
दिवा लावून वाघदेवाची पूजा केली जाते. काही बांधव नारळ फोडून पण वाघदेवाची पूजा करतात.
वसूबारशीलाच वाघबारशी असेही म्हणतात.
या दिवशी लोक शेतातील कामे करत नाही. त्या दिवशी गुराखी नवी कपडे घालून आनंदोत्सव
साजरा करतात.
No comments:
Post a Comment