आदिवासी रानभाज्या –कडूकंद (कडूकांद)
कडूकंद -
आदिवासी भागात जंगलामध्ये
कडूकंदाच्या वेली बऱ्याच झाडावर दिसतात. त्याचे पाने पिंपळाच्या पानाच्या आकाराची
असतात. या वेलीला जमीनीमध्ये कंद लागतो. तो चवीला खुपच कडू असतो. त्यावरून त्याचे
नाव कडूकंद असे आहे.
रान भाजीचा उपयोग
कडूकंद हा चवीला कडू
असतो. चवीला कडू असतो. त्या कंदाला उकडवून त्याच्या चकल्या पाडून त्याना वाहत्या ओहोळात
किंवा नाल्या मध्ये रात्रभर बुडवून ठेवले जाते. त्यामुळे त्यांचा कडूपणा जाऊन त्या
चवीला निवळतात. सकाळी त्यामध्ये मीठ टाकून त्यांना शिजवले जाते. त्याचा नास्तासाठी(नाहरी)
साठी आदिवासी भागात वापर केला जातो. तसेच या कंदाच्या वळी खाणे अरोग्यासाठी
फायदेशीर असते
कडूकंद ओळख
वेलीची पाने बघून
मुळाजवळील कंद काढता येतात.
पानांचा देठाची चव
घेतल्यास कडू लागते
कडूकंद चे फोटो
कडूकंदाची वेल व पाने
No comments:
Post a Comment