मोहाचे झाड- मोहफुलाची दारू
मोहाचे झाड हे
मोठे, विस्तीर्ण, उंच असते. पानगळीच्या भूप्रदेशामध्ये मोहाची झाडे मोठया प्रमाणात
आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश,बिहार, ओरीसा या राज्यामध्ये
मोहाची झाडे आहेत.
मोहाचे झाड
आपल्या
आदिवासी, डोंगराळ, उष्ण भागात मोहाची झाडे जंगलात उपलब्ध आहेत. मोह झाडाची उंची 40
ते 60 फुट उंच असते. मोहाचे आयुष्य 60 ते 70 वर्ष असते. खोडाचा घेर मोठा, साल 1 ते
2 सेमी जाड असते. मोहाच्या गाभ्यातले लाकूड लालसर तपकिरी असते. मोहाचे लाकूड कठिण,
टणक, सरळ व टिकाऊ असते. मोहाची पाने लांब, गुळगुळीत असतात. फांदीच्या शेंडयावर
पानांचा झुबका उगवतो. जानेवारी ते एप्रिल दरम्यान मोहाची पाने गळतात. त्यावेळी मोह
फुलू लागतो. फुले ही फिक्या बदामी रंगाची असतात. फुले अर्धा इंच आकाराची असतात.
मोहाची फुले ही रात्री फुलतात. सकाळी झाडाखाली मोहाच्या फुलांचा सडा पडलेला असतो.
फुलांचा बहर संपला की, मोहाच्या झाडाला फळे यायला लागतात. या फळांचा आकार गोल
असतो. त्याच बरोबर मोहाला नवीन पालवी यायला लागते. या पालवीचा रंग लालसर असतो.
मोहाला आलेल्या
फळांचा रंग हिरवा असतो. फळे ही रसाळ, चवीला गोड लागतात. जून मध्ये ही फळे पिकून
खाली पडतात. खाली पडल्यानंतर त्यापैकी काही बिया जमिनीत रूजून नविन रोपे तयार
होतात.
आदिवासी भागात मोह वृक्षाचे महत्व
आदिवासी लोकांसाठी
मोहाचे झाड म्हणजे कल्पवृक्ष मानले जाते.
मोहाच्या फुला-फळांपासून आर्थिक रोजगार येथिल लोकांना मिळतो. तसेच फुला-फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात.
मोह फुलांचे महत्व
मोहाची फुले ही
आपल्या आदिवासी समाजात आर्थिक उत्पनाचे साधन ठरत आहेत. आदिवासी बांधव या फुलांचा
सकाळी वेचून त्यांना उन्हात सुकवितात. सुकविल्यानंतर त्याची बाजारात विक्री करतात.
मोहफुलांमध्ये
साखर तसेच अल्कोहलचे प्रमाण चांगले असते. आदिवासी भागात या पासून दारू बनविली
जाते. मोहफुलाची दारू औषधी असते. या दारूमध्ये ब जीवनसत्व असते. विवाह, पितरा, पाचवी कार्यक्रमांकरीता या
दारूचा वापर होतो. तसेच मोहफुलाची दारू ही सणांसाठी पवित्र मानली जाते, देवासमोर
ठेवली जाते. तसेच काही आजारावर मोहफुलाची दारू औषध मानली जाते.
मोहफुलात
साखरेबरोबर कॅल्शियम, कार्बोहायड्रेडस, प्रोटिन, व्हिटॅमिन व अनेक पोषक द्रव्य
असतात. हि फुले खाण्यासाठी औषधी असतात.
मोहफुलांपासून
शुदध् अल्कोहल मिळतो. इंजिनचे इंधन म्हणून याचा वापर करता येतो. व्हिनेगार तयार
करण्यासाठी मोहफुलांचा उपयोग होतो.
मोह फळांचे महत्व
मोहाची फळे ही
जून महिन्यामध्ये पिकतात. ही फळे आकाराने गोल असतात. फळांमध्ये भरपूर रस असतो.
पिकलेली फळे गळून जमिनीवर पडतात. हि फळे आदिवासी भागात गोळा करून त्यामधील बिया
काढतात.
कच्ची फळे ही
शिजवून भाजी बनवून खाल्ली जातात.
फळांमध्ये भरपूर प्रमाणात साखर असते.
मोहाच्या
फळांमधील बियांमध्ये 25 टक्के तेल असते. तसेच प्रोटिन, फायबर, फॉस्फरस, पोटॅश
यांचे अंश या बियांमध्ये असतात. आदिवासी बांधव या बिया फोडतात, सुकवितात.
लाकडाच्या घाण्यात अथवा तेल गिरणीत याचे तेल काढले जाते.
मोहाच्या
बियांचे तेल आजही स्वंयपाक व दिव्यात वापरले जाते. या तेलाचा वापर चर्मरोगांसाठी,
अंगाची मालिश करणे कामी वापरला जातो. डोकेदुखीवरील विवीध औषधांमध्ये या तेलाचा
वापर होतो.
मेनबत्ती बनवन्यासाठी
मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. कपडे धुण्याचा साबन बनविन्यासाठी
मोहाच्या बियांच्या तेलाचा वापर केला जातो. या साठी साबन बनविणाऱ्या कंपन्यामध्ये
मोहाच्या बियांची मागणी मोठया प्रमाणात असते.
बियांमधून तेल
काढल्यावर उरलेला चोथा म्हणजे पेंढ ही शेतात खत म्हणून वापरली जाते. सल्फेट तसेच
नायट्रोजनच्या खतात ही पेंढ मिसळतात व शेतात देतात.
मोहाच्या
बियांच्या पेंढीचा धुर केल्यास साप तसेच उपद्रवी किडे पळून जातात. पाण्यातील मासे
माजविण्यासाठी या पेंढीचा वापर केला जातो.
मोहाचे झाड व आदिवासी लोकांचे नाते
आदिवासी भागात
मोहाच्या झाडाला आजही पवित्र वृक्ष मानतात. अन्नदाता वृक्ष असल्याने त्या झाडाला
तोडत नाही. जन्म, मृत्यू, सण, विवाह प्रसंगी या झाडाची पूजा करतात. आदिवासी भागात लग्नाच्या
दिवशी मोहाची फांदी मांडवात रोवतात. त्याची पूजा करतात. नवरा-नवरी सुखी संसाराची
प्रार्थना करतात.
अशा प्रकारे
आदिवासी समाजात मोह वृक्षाचे महत्व आहे.
No comments:
Post a Comment