आदिवासी रानभाज्या –कवळी भाजी
कवळी
ची भाजी -
आदिवासी भागात
रानभाज्या वापर मोठया प्रमाणात आहारात केला जातो. जून महिन्यामध्ये पावसाला सुरवात
झाली की, जंगलात वेगवेगळया रानभाज्या उगवायला सुरवात होते. सगळीकडील निसर्ग हा
हिरवागार होण्यास सुरवात होतो. यावेळी कवळी ही रानभाजी जंगलात उगवते. साधारण पाऊस
सुरू झाल्यानंतर आठवडा ते दोन आठवडयानंतर कवळीची पाने शिजवून खाण्यायोग्य असतात.
कवळीमध्ये औषधी गुणधर्म असतात. आदिवासी भागात मंगळवार च्या दिवशी भाजीचा देव करून
खायची ठरवितात. नव्या वर्षातील, नवीन पाण्याची ही भाजी असते. या दिवशी वार धरला
(शेती कामाला सुटटी) घेतली जाते.
कवळी भाजी
खाण्याच्या दिवशी काही मंडळी जंगलात, डोंगर-माळरानावर जाऊन कवळी ची पाने घेऊन
येतात. भाजी शिजविल्यानंतर घराच्या लवचणीवर, देवापुढे, चुलीवर याचा नैवदय ठेवला
जातो. या दिवशी कुलदैवतीची पूजा केली जाते. त्यांना भाजीचा नैवदय दाखविला जातो.
कवळी भाजीच्या हळदीप्रमाणे
मुळया असतात. या मुळया हया पांढऱ्या, लांबट असतात. कवळीच्या मुळयामध्ये औषधी
गुणधर्म असल्याने यांना बाजारात मोठी मागणी असते. बऱ्याच ठिकाणी याची शेती करून
उत्पादन घेतले जाते.
कवळी रान भाजीचा उपयोग
साधारण पावसाळ्यात सुरवातीच्या पंधरा दिवसातच
कवळीची भाजी जंगलात उगवते. या भाजीच्या मुळीलाच सफेत मुसळी असे संबोधले जाते. ही
सफेत मुसळी अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरली आहे.
1 कवळीच्या
मुळयामध्ये सॅपोजिनाईन हा उत्तेजक घटक असतो. याचा उपयोग शक्तिवर्धक, टॉनिक म्हणून
केला जातो.
2 कवळीच्या
मुळयांचा उपयोग कावीळ, दमा, लघवीची जळजळ, अतिसार, पोटदुखी या आजारासाठी होतो.
3 कवळीची भाजी लहान
मुलांना दुध पाजनाऱ्या मातांसाठी, दुधवाढी साठी उपयोगी आहे.
4 कवळीची भाजी
शुक्रजंतूसाठी पोषक, मधूमेही लोकांसाठी गुणकारी आहे
कवळी रानभाजी चे फोटो
No comments:
Post a Comment