महत्वाची माहिती

Monday, September 21, 2020

केम पर्वत- सुरगाणा तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण- केमची यात्रा

केम पर्वत- सुरगाणा तालुका

 

नाशिक जिल्हयातील सुरगाणा हा संपुर्ण आदिवासी तालूका आहे. नाशिकपासून सुरगाणा तालुक्याचे ठिकाण साधारण 100 किमी आहे. डोंगर-दरी, वनसंपत्ती, नैसर्गिक संसाधनांनी नटलेला तालुका म्हणजे सुरगाणा होय. सुरगाणा तालुक्यातील पूर्व भागात केम चा डोंगर हे तालूक्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.

केमचा डोंगर (पर्वत)

            सुरगाणा तालुक्यातील केम हे सर्वात उंच ठिकाण आहे. केमची समुद्रसपाटी पासून उंची 900 मीटर एवढी आहे. सुरगाणा तालुका गावापासून पूर्वेला स्थित डोंगररांगामध्ये हे ठिकाण आहे. चिराई घाटातून पुढे शिंदे दिगर अथवा हरणटेकडी येथून या ठिकाणी जाता येते. या डोंगरावर देवीचे मंदिर आहे. दिपवाळीमध्ये या केमची यात्रा येथे भरते. या यात्रेला आदिवासी भागातील हौसी लोक या डोंगरावर  येतात. यात्रेत महत्वाचे म्हणजे खादयपदार्थ, खाऊ, फुगे यांची विक्री होते.

            केमच्या डोंगरामधून नार,पार,कादवा, अंबिका, वाझडी या नदयांचा उगम होतो. केमच्या पर्वतावर अनेक दुर्मिळ, औषधी वनस्पती आढळतात.

केमचा डोंगरावर कसे जाल -

दिपवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला येथे जाता येईल. नाशिक जिल्हयातील पश्चिमेकडील तालुका सुरगाणा मध्ये याचे स्थान आहे. येथे जाण्यासाठी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.

नाशिहून येतांना

1                      नाशिक -दिंडोरी-वणी-घागबारी हरणटेकडी– शिंदे दि- केम पर्वत(नागझरी मार्गे)

2                    सुरगाणा- चिराई घाट- शिंदे दिगर- केम पर्वत

केम  पर्वत पर्यटन बाबत घ्यावयाची दक्षता.

1 केम पर्वतावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही, त्यामुळे सोबत पाणी बाटली ठेवावी

2 चढ तसेच उतार तीव्र असल्याने पाय घसरून पडण, ठेच लागणे या बाबींची आपण स्वत काळजी घ्यावी.

केम पर्वत पर्यटन जवळील इतर प्रेक्षणिय स्थळे

1 ‍गिरजामाता मंदिर,  शिंदे दिगर तालुका सुरगाणा जि नाशिक 2 किमी

2 सापउतारा (गुजरात) बोरगांव मार्गे हतगडा-सापउतारा अंतर 15 किमी.

3 सप्तश्रृंगी गड (वणी) घागबारी-वणी- गड अंतर 40 किमी  

केम पर्वत फोटो




1 comment: