बेलबारी – माणकेश्वर मंदिर (सुरगाणा
पर्यटन)
महाराष्ट्रातील
पश्चिम डोंगर रांगेमधील उत्तरेकडील नाशिक जिल्हयामध्ये सुरगाणा तालूक्याचे स्थान
आहे. सुरगाणा तालुका पुर्णत आदिवासी तालुका आहे. पर्यटनाच्या बाबतीत विवीधतेने
नटलेले निसर्ग सौंदर्य या तालुक्यास लाभले आहे. या तालुक्यातील अशाच प्रसिध्द
पर्यटन बेलबारी- माणकेश्वर मंदिर विषयी माहिती आपण घेणार आहोत
बेलबारी तीर्थस्थळ
सुरगाणा पासून
10 किमी अंतरावर माणी गाव वसले आहे. माणी गावाजवळच दोन नदयांचा संगम होतो. या ठिकाणालाच बेलबारी
म्हणून ओळखले जाते. माणी गावाजवळ बेलबारी तीर्थस्थळ आहे. बेलबारी येथिल माणकेश्वर
मंदिर प्रसिध्द आहे. बेलबारी या ठिकाणी महाशिवरात्री निमीत्ताने यात्रा भरते. या
यात्रेमध्ये स्थानिक व्यापारी सहभागी होतात. तसेच शिवरात्री निमीत्ताने स्थानिक
लोक या यात्रेला जमतात. यात्रेमध्ये पाळणे, खेळणी, तमाशा या मनोरंजनाच्या साधनांची
भर असते. तसेच यात्रेमध्ये लहान मुलांची खेळणी, खाऊ, खजूर, फुगे, उसाचा रस,
सोयाबीन चिल्ली, खादयपदार्थ इत्यादी
गोष्टी विक्रीला येतात.
बेलबारी येथे
माणकेश्वर मंदिर, शिवलिंग, महालक्ष्मी मंदिर यांचे दर्शन होते. तसेच मंदिरापासून
दोन नदयांचा संगम दिसतो. या ठिकाणी बेलबारी धबधबा सुदधा आहे. त्याचा एक खोल डोह
आहे.
बेलबारी येथे भेट देण्यासाठी
एक दिवसाच्या भेटीसाठी
उत्तम तीर्थक्षेत्र आहे. महाशिवरात्री निमीत्ताने या ठिकाणी यात्रा भरते. या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी पुढील मार्गाने
आपण येथे जाऊ शकतो.
नाशिहून
येतांना
नाशिक-
दिंडोरी-वणी- सुरगाणा-माणी- बेलबारी तीर्थक्षेत्र (वणी-बोरगांव मार्गे)
नाशिक- गोळशी-ननाशी-मनखेड-
माणी- बेलबारी तीर्थक्षेत्र (पेठरोड मार्गे)
सुरगाणा ते
माणी अंतर 10 किमी आहे.
बेलबारी पर्यटनात काय बघता येईल
1 बेलबारी
येथिल नदयांच संगम
2 बेलबारी
मंदीर
3 बेलबारी
यात्रा (फक्त महाशिवरात्री च्या दिवशी)
बेलबारी पर्यटन जवळील इतर प्रेक्षणिय स्थळे
1 भिवतास धबधबा
–माणी पासून अंतर 30 किमी.
2 सापउतारा
गुजरात- हिल स्टेशन पासून अंतर 30 किमी.
3 हतगड किल्ला -
बोरगांव माणी 30 किमी.
बेलबारी येथिल नदीवरील धबधबा
No comments:
Post a Comment