भिवतास धबधबा- सुरगाणा तालुका
नाशिक जिल्हयातील
सुरगाणा हा संपुर्ण आदिवासी तालूका आहे. नाशिकपासून सुरगाणा तालुकक्याचे ठिकाण
साधारण 100 किमी आहे. डोंगर-दरी, वनसंपत्ती, नैसर्गिक संसाधनांनी नटलेला तालुका
म्हणजे सुरगाणा होय. त्याचबरोबर सुरगाणा तालुक्यामध्ये केळावण गावाजवळ भिवतास
नावाचा धबधबा आहे. या भिवतास धबधब्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
भिवतास धबधबा
सुरगाणा तालुक्यातील अंबोडा,
खोकरविहीर, केळावण परीसरातील नाले मिळूय भिवतास धबधब्यात पाणी येते. भिवतास
धबधब्याचे पाणी साधारण एक हजार फुट उंचीवरून कोसळते. हा नयनरम्य नजारा बघण्यासाठी पावसाळयात आपल्याला भेट दयावी
लागेल. पुराणातील अख्यायिकेनुसार महाभारतातील पांडवांपैकी भिमाने या ठिकाणी नांगर(आदिवासी
भाषेत आऊत) धरले होते. त्याची सुरवात हया ठिकाणी केल्यामुळे येथे दरी पडून धबधबा
तयार झाला. अशी लोकांची समजूत आहे. त्यावरून भिमाचे नांगर व त्याच्या नांगराची सरी
म्हणजे तास, भिव व तास असे भिवतास हे नामकरण धबधब्याचे झाले असावे असे लोक मानतात.
भिवदेव, पाराबती, बैल, औत, आळवट परेटी आणि बेलीचा पाबर या प्रकारचे डोह भिवतास
धबधब्याच्या ठिकाणी आहेत.
.
भिवतास धबधबा बघण्यासाठी
एक दिवसाच्या भटकंती
साठी उत्तम ठिकाण आहे. नाशिक जिल्हयातील पश्चिमेकडील तालुका सुरगाणा मध्ये याचे
स्थान आहे. त्याचे मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.
नाशिहून येतांना
1
नाशिक – गोळशी (नाशिक-पेठ मार्गे)-ननाशी-बाऱ्हे- ठाणगांव- केळावण
2
नाशिक- सुरगाणा-पळसन- राक्षभूवन- अंबोडा- केळावण (अंतर जास्त आहे.)
गुजरातहून येतांना
3
धरमपूर – पंगारबारी -विल्सन हिल-गुंदिया- राक्षसभूवन-
अंबोडा-केळावण
भिवतास धबधबा पर्यटन बाबत घ्यावयाची दक्षता.
1 भिवतास धबधबा नव्यानेच
लोकांमध्ये परिचित झाल्याने या ठिकाणी
अजून पर्यटन विकास
हा चालू स्थितीत आहे. कठडे किंवा संरक्षक भिंती नसल्याने या ठिकाणी
पर्यटकांनी काळजी घ्यावी.
2 धबधब्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड खोल दरी आहे. खाली फक्त खडकच
आहे.वाकून पाहणे, डोकावणे या मुळे अपघात होऊ शकतो.
भिवतास धबधबा पर्यटन जवळील इतर प्रेक्षणिय स्थळे
1 शंकर धोध, वाघमाळ,
गुजरात – भिवतास पासून अंतर 20 किमी.
2 शेकेला पॉईंट- चिकन,
राक्षसभूवन भिवतास पासून अंतर 10 किमी.
3 गिधाड आखडी- मधुरी,
राक्षसभूवन (गिधाडांचे वस्तीस्थान पार नदी)भिवतास पासून अंतर 12
किमी.
4 विल्सन हिल- पंगारबारी, गुजरात (हिल स्टेशन)तसेच कपल पॉईंट भिवतास पासून अंतर 23 किमी.
भिवतास धबधबा
Very nice bhivtaas Waterfall
ReplyDelete