महत्वाची माहिती

Saturday, November 28, 2020

आदिवासी रानभाज्या –कंदमुळे वरा, कोयची

 

आदिवासी रानभाज्या –कंदमुळे वरा, कोयची

 

कंदमुळे -

 

आदिवासी भागामध्ये आजही वरा, कोयची ही कंदमुळे आवडीने वाडयात, शेतात लावतात. आहारामध्ये याचा वापर आजही आदिवासी भागात केला जातो. गावामध्ये अथवा शेतामध्ये सागाच्या फांदीवर (खोशावर) वरा, कोयचीच्या कंदाचा वेल वाढविला जातो. हे कंद जमीनीमध्ये मध्ये वेलाच्या मुळाशी लागतात.  काही  कंद वेलाला पण लागतात. 

 


कंदमुळे रान भाजीचा उपयोग

 

·         कंदमुळे साधारण चवीला बटाटा सारखी चवीची असतात.

·         कंदमुळांचे आर्युवेदिक उपयोगही आहेत,. विविध दृष्टीने गुणकारी आहेत.

 

कंदमुळांचा आहारात वापर

 

·         स्वंयपाकामध्ये बटाटयाची भाजी बनवितो तशी चिरून ही कंदमुळे शिजवतात.

·         वरा हा कंद उकडून खाल्यावर छान लागतो.

·         भाजलेले वरे हे चवीला उत्कृष्ठ लागतात.

·         कोयचीची भाजी कुळदाच्या पिठाबरोबर शिजवल्यास छान लागते. त्यासोबत नागलीची भाकरी व मिरचीचा ठेचा असायला हवा.

·          

 

कंदमुळांची ओळख

 

वेलीच्या पानावरून कंद कोणता आहे ओळखता येते. वरा, कोयची या कंदाची पाने ही नागवेलीच्या पानाप्रमाणे आकाराची असतात. नागवेलीच्या पानापेक्षा आकाराने मोठी असतात.

 

 रानभाजी चे  फोटो

 


1 comment:

  1. Kafi achhi tarah se Adivasi kandmulo ki Jankari di hui hai, isase adivasi foods ke bare me dusare logo ko jankari mil rahi hai...

    ReplyDelete