आदिवासींची पितरा
सर्वपित्री अमावस्या
आदिवासी भागामध्ये मराठी
महिना भाद्रपद अमावस्या निमीत्ताने पितरा (सर्वपित्री अमावस्या) हा सण साजरा केला जातो.
पितरा सणाच्या निमीत्ताने आपल्या पूर्वजांना पंचपक्वानांचा नैवदय दाखवून, कावळयाला
हा नैवदय खायला घालतात.
सर्वपित्री अमावस्या सण कसा साजरा करतात
आमच्या आदिवासी भागात
पितराच्या दिवशी, आपल्या मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून या सणाचे
महत्व आहे. या दिवशी नदीवरून पकडलेले मासे शिजवतात. त्याचबरोबर मोहाची दारू, भात,
तुरीची दाळ,डांगराची भाजी, तांदळाची खीर असा नैवदय बनविला जातो.
पितराच्या सणासाठी
बनविलेला नैवदय सापडाच्या पानावर वाढला जातो. चुलीवर रानगौरी जाळली जाते.
त्यामध्ये गाईचे तुप, सोबत तयार केलेला नैवदय आपल्या पूर्वजांच्या नावाने या चुलीवरील
रानगौरीवर जाळला जातो. मोहाची दारूही सोडली जाते त्याचबरोबर अजून दुसऱ्या पानावर
थोडा-थोडा नैवदय घेऊन् दळणाचे जात, चुलीवर, धान्याची कोठी,उखळ व एक घराच्या
छपरावर कावळयासाठी ठेवला जातो. या दिवशी कावळयाच्या माध्यमातून आपले पूर्वज आले आहेत
म्हणून त्यांना काव-काव असे हाक मारून बोलावले जाते. एकदा कावळयाने नैवदय ग्रहण
केला की, कुटूंबातील मंडळी एकत्र बसून जेवण करतात.
सण साजरा झाल्यानंतर
संध्याकाळी पितरांची बोळवण केली जाते. त्यांना घरापासून लांब नेऊन बोळावण केली
जाते. अशा प्रकारे आदिवासी बांधव पितराचा सण साजरा करतात.
No comments:
Post a Comment