मळा - ‘खेकडा’ पकडण्याचा पिंजरा
मळा-
आदिवासी भागामध्ये नदीला
खेकडे पकडण्यासाठी बांबूच्या काडयांपासून एक पिंजरा बनविला जातो. त्या
पिंजऱ्यामध्ये खेकडयासाठी खादय ठेवले जाते. खेकडा खादय खाण्यासाठी या पिंजऱ्यामध्ये
अडकतात. या पिंजऱ्याला आपल्या आदिवासी भाषेत मळा म्हणतात.
मळा कसा तयार करतात
बांबू फोडून त्याच्या
बारीक कांडया घासून, त्यापासून मळा विनला जातो. सुरवातीला गोल पाईपप्रमाणे विणून
त्यामध्ये तीन कप्पे ठेवले जातात. तीन कप्पे अशा पध्दतीने बनवितात की, त्यामध्ये
फक्त जाण्याचा मार्ग असतो. परत पाठीमागे येण्याचा मार्ग बंद केला जातो अशा पध्दतीने
मळयाची रचना केली जाते. तीसऱ्या कप्प्यामध्ये खेकडा काढण्यासाठी चौकोणी हात शिरेल
एवढी जागा ठेवली जाते.
मळयाचा वापर खेकडे पकडण्यासाठी कसा कराल
· बाजारातुन मासेविक्रेत्याकडून
माश्याच्या पोटातील अनावश्यक घाण, आतडे, डोके, शेपटा इत्यादी आणावी.माश्याची घाण नसल्यास
कोंबडयाची आतडे वापरली जातात.
· या
घाणीली सागाचे पान अथवा प्लॅस्टिक मध्ये भरून या मळयाच्या तिसऱ्या कप्प्यामध्ये ठेवतात.
· तिसऱ्या
कप्प्याला सागाचे पान लावून दोरीने बांधले जाते. त्याला नदीमध्ये रात्रभर खेकडे
पकडन्यासाठी बुडवून ठेवले जाते.
मळा कसा दिसतो- फोटो
No comments:
Post a Comment