महत्वाची माहिती

Tuesday, September 1, 2020

आदिवासी कन्या - सावरपाडा एक्सप्रेस – कविता राऊत


सावरपाडा एक्सप्रेस – कविता  राऊत

परिचय-


पुर्ण नाव – कविता रामदास राऊत

आईचे नाव – सुमित्रा

जन्म दिनांक – 05 मे 1985

गाव सावरपाडा तालूका त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक

आंतरराष्ट्रीय धावपटू.

इयत्ता 5 वी च्या बालभारती पुस्तकातील पाठ क्रमांक 4


                   दुर्गम असलेला आदिवासी भाग त्रंबकेश्वर तालुक्यातील हरसुल जवळील सावरपाडा खेडयातून जन्मलेली आदिवासी कन्या म्हणजेच कविता राऊत होय.  सावरपाडा म्हणजेच डोंगरदऱ्यांनी वेढलेला, पाण्यासाठी मैलोमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाडयावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूडफाटा गोळा गोळा करणारी मुलगी. तीने राष्ट्रकुल आणि आशियायी स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिंपिक स्तरावर झेप घेतली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य पदके कविताने पटकावली लागोपाठ दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत होय. चीनमधील गुआँगजऊ येथे झालेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले.   
कविताने नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा  स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, पण कविताचे वेगळपण वडील रामदास व आई सुमित्रा यांना तीव्रतेने जाणवले नाही. मात्र कविताच्या पायांमधील चमकदार दौड ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी हेरली. त्यांनी आई-वडीलांची मानसिकता तयार केली. नाशिकच्या भोसला मिलीटरी स्कुलच्या मैदानावर तंत्रशुदध धावण्याचे धडे कविताला दिले.
गुजरात मधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्यपदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. मग पुढे विजेंद्र सिंग यांनी 2002 पासून पाच वर्ष त्यांच्या घरी ठेवून स्वतच्या मुलीसारखा सांभाळ केला व धावण्याच्या गतीकडे लक्ष केंद्रित केले.
कवितामुळे सावरपाडयाचे नाव सर्वदुर पसरले आहे. कविता तिथल्या मुलींसाठी आदर्श ठरली आहे. कविता आज भारतातील अव्वल धावपटटू आहे.  पी. टी. उषा या धवपटटूला ती आपला आदर्श मानते.
कविता ही तिच्या जीवनप्रवासाची खरी नायिका आहे.

No comments:

Post a Comment