महत्वाची माहिती

Tuesday, September 1, 2020

रानभाज्या – तेरा ची भाजी


आदिवासी रानभाज्या –तेरा ची भाजी


तेरा -

आदिवासी भागात अळू  प्रमाणेच दिसनाऱ्या रानभाजीला तेरा म्हणतात. तेराची पाने अळूच्या पानापेक्षा लहान आकाराची असतात. तेराची भाजी ही जंगलात आढळते. या रानभाजी मध्ये बरेचशी पोषक तत्वे असतात.

तेरा या रान भाजीचा उपयोग

            साधारण पावसाळ्यात अनेक ठिकाणी, जंगलात तेराची भाजी उगवते. तेराचे पातवड, वडया, तसेच दाळीमध्ये एकत्र करून शिजवले जाते. तेराची भाजी चवीला खुप चांगली लागते. ताजी रानभाजी मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असते.

आदिवासी भागातील रानभाजीचा देव

जुन मध्ये पाऊस सुरू झाल्यावर तेराची भाजी रानात उगवते. जंगलात भाजी उगवल्यावर गावामध्ये एक दिवस तेराच्या भाजीचा देव म्हणजेच ‘ तेरा धरला ’ जातो. या दिवशी जंगलातून आदिवासी बांधव तेराची पाने आणतात. ती शिजवून त्याचा नैवदय देवासमोर ठेवतात. अशा पध्दतीने तेरा भाजीसाठी एक दिवस आदिवासी भागात सण पाळला जातो.

अळू व तेरा मधील फरक

अळूची पाने मोठी असतात तर तेराची पाने लहान असतात.
अळू आपल्या घरी सरी घालून लावतात तर तेरा हे फक्त जंगलातच आढळते.
अळूचे कंद असतात मात्र तेरा च्या मूळी असतात.

तेरा रानभाजी चे  फोटो

01 




02


No comments:

Post a Comment