अळू
आदिवासी भागात अळू ज्याला
ब्रह्मराक्षस म्हटलं जाते, साधारणतः ओल्या मातीच्या पाण्याच्या ठिकाणी हा खूप फैलतो.
आपल्या आदिवासी भागामध्ये वाडा, भितीमागे हारी(मातीची उंच सरी) करून त्यामध्ये अळूच्या
कांदया लावल्या जातात. ज्या ठिकाणी नेहमी पाणी, ओलसरपणा असतो अशा ठिकाणी अळू छान
वाढते. आपण एखादा मोठा प्लास्टिक टब (घमेल) घेऊन त्यात एकवेळ चार पाच कंद लावले
तर हफत्याला 25-30 पाने आरामात मिळतात. अळूची पाने गळ्याला खाजवतात पण
त्यामानाने ब्रम्हराक्षसची पाने अजिबात खाजवत नाही.. अळूचे देठ हिरवे असते तर
ब्रम्हराक्षसचे देठ हा काळपट असतो. ह्या पानांची वडी खुसखुशीत बनते, त्या गोलाकार
कापून तळून खायची वेगळीच मजा.. पानाचे बेसन पिठाचे पातवड बनवून त्याचा फोडणीचा
खुरमुराही छान लागतो. पुन्हा एक राहिलं की पाने तोडतांना थोडा काळजीपूर्वक तोडावीत
कारण त्यातून निघणारा द्रव पदार्थ कपड्यांवर सांडला तर सहजासहजी निघत नाही..
या राणभाजीचे (अळू / ब्रह्मराक्षस) फायदे खूप आहेत -
पावसाळ्यात ताजी
रानभाजी मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. त्यापैकी अनेकांची आवडती रानभाजी
म्हणजे अळू. अळूचे पातवड, ऋषीपंचमीला, पोळयाला केली जाणारी अळूची भाजी ते अगदी
कुरकुरीत अळूवड्या अशा विविध स्वरूपात अळू आहारात घेतला जातो. नैसर्गिकरित्या
अळूला खाज असल्याने त्याचा आहारात समावेश करणे आजकाल अनेकांना किचकटीचे वाटते.
परंतू त्यामधील हे आरोग्यदायी गुणधर्म जाणून घेतल्यास त्याची चव चाखण्याचा मोह तुम्हांलाही
आवरता येणार नाही.
'व्हिटॅमिन ए'चा मुबलक साठा-
अळूच्या पानांमध्ये
व्हिटॅमिन 'ए' मुबलक प्रमाणात आढळते. सुमारे 100-200 ग्रॅम अळूमधून व्हिटॅमिन ए ची
दैनंदिन गरज पूर्ण होण्यास मदत होते. अळूमध्ये 120 % 'व्हिटॅमिन ए' आढळते. यामुळे
त्वचा सतेज होण्यास मदत होते.
'व्हिटॅमिन सी' चा पुरवठा होतो -
केवळ आंबट
पदार्थांमध्ये 'व्हिटॅमिन सी' आढळते हा समज दूर करून अळूचा आस्वाद घ्या.
कारण अळूच्या पानांमध्ये 'व्हिटॅमिन सी' चा सुमारे 80% साठा असतो. त्याचा फायदा
जखम भरून निघण्यास होतो. तसेच हिरड्यांचे आरोग्य सुधारते. 'व्हिटॅमिन सी'ची
दैनंदिन आवश्यकता पूर्ण होईल.
आयर्नची झीज भरून निघते -
रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अॅनिमियाचा त्रास
रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने
आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते. अळू प्रमाणेच आहारात टाळू नका.
दृष्टी सुधारते -
अळूच्या पानांच्या
सेवनामुळे दृष्टी सुधारायला मदत होते. तसेच डोळ्यातील शुष्कपणाच्या समस्येवर
फायदेशीर ठरत आहे.
कॅल्शियमचा पुरवठा करते -
अळूच्या पानांमध्ये
कॅल्शियम घटक आढळतात. त्याचा फायदा हाडांची कमजोरी कमी करण्यास मदत होते. वाढत्या
वयानुसार हाडांची होणारी झीज कमी होते. कॅल्शियमची कमतरता भरून काढेल.
अनेक त्रासापासून धोका कमी होतो -
शरीरात वाढणारा
ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस, फ्री रॅडीकल्सचा त्रास कमी करण्यास मदत करते. यामुळे अनेक
घातक आजारांपासून बचाव होतो. अळूच्या पानांमधील आयोडीन घटक थायरॉईड ग्रंथींचे
कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. Hypothyroidism चा त्रास कमी होतो.
अळूचा आहारात समावेश कसा करावा ?
अळूच्या पानांमध्ये
फायबर घटक अधिक आणि कॅलरीज अत्यल्प प्रमाणात आढळतात. त्यामुळे हा अल्काईन
स्वरूपाचा, थंड प्रवृत्तीचा आहे. यामुळे वजन घटवणार्यांच्या, मधूमेहींच्या आहारात
फायदेशीर ठरते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास अत्यंत फायदेशीर आहे.
अळूच्या पानांमधून केवळ
फायबरचा पुरवठा होतो. परंतू त्याच्या सोबतीला डाळीचा समवेश केल्यास
प्रोटीन्सचादेखील पुरवठा होतो. त्यामुळे हे एक उत्तम आणि परिपूर्ण आहार बनते.
अळूवडीतही बेसनाचा समावेश असल्याने त्या अधिक रूचकर आणि आरोग्यदायी बनतात. परंतू
अळूवडीचा उंडा वाफवल्यानंतर खाण्यास आरोग्यदायी आहे. अळूवडीप्रमाणेच त्याची पातळ
भाजी बनवता येऊ शकते. यामध्ये अळूची पानं डाळी शिजवून त्याचा आहारात समावेश करा.
शाकाहारींची दैनंदीन प्रोटीनची गरज पूर्ण करेल.
अळूचा आहारात समावेश करताना कोणती काळजी घ्याल ?
अळूला नैसर्गिकरित्या
खाज असल्याने तो स्वच्छ आणि नीट साफ करणे आवश्यक आहे. तसेच अळू अपुरा शिजवल्यास पोटदुखीचा
त्रास होऊ शकतो. त्यामुळे तो योग्यरित्या शिजवा. युरिक अॅसिड अधिक प्रमाणात
असलेल्यांनी अळू कमी खावा. तसेच काहींना अळूची अॅलर्जी असू शकते. त्यामुळे अळूवर
ताव मारण्याआधी त्याची अॅलर्जी नाही याची खात्री करून घ्यावी.
·
NICE
ReplyDelete