महत्वाची माहिती

Wednesday, August 5, 2020

09 ऑगस्ट आदिवासी दिन


09 ऑगस्ट आदिवासी दिन


  
आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा जनसमुह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासींचा समावेश अनुसूचित जमाती (Schedule Tribe ST) मध्ये केला आहे.


भारतात ९ ऑगस्ट हा दरवर्षी आदिवासी दिवस म्हणून साजरा होतो. आदिवासी लोक भारताखेरीज जगातील अन्य देशांतही आहेत. इ.स. १९६२ साली शिलॉंगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे-


"एका समान भाषेचा वापर करणाऱ्या, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणाऱ्या, एका विशिष्ट भू-प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेल्या, अक्षरओळख नसलेल्या व रक्तसंबंधावर आधारित, सामाजिक व राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिक पालन करणाऱ्या एकजिनसी गटाला 'आदिवासी समाज' म्हणतात.’’


भारतात पुढीलप्रमाणे मुख्य आदिवासी जमाती आहेत.
आंध, ओरांव, कातकरी, कोकणा, कोरकू, कोलाम, गोंड, टोकरे कोळी, ठाकर, परधान, पावरा, भिल्ल, मल्हार कोळी, मन्नेरवारलु, महादेव कोळी, माडिया गोंड, वारली, हलबा.

No comments:

Post a Comment